Tya Doghi | त्या दोघी


त्या दोघी आत शिरल्या
फतकल मारून दोधी
त्याच्यासमोर खुशाल बसल्या.
तो हसला, ती हससी
तिच्या आईदेखत त्याने,
तिचा हात पकडला.
अर्धा तास तब्बल
हात नाही सोडला.
जीव कासावीस झाला
तो थोडाही नाही लाजला
वरुन विचारतो शहाणा.
ताई नास झाला नाहीना
दातओठ आपण खाऊ नका
रागानेही पाहू नका
हेवा त्याचा करु नका
अर्ध्या तासानंतर मात्र
दोघीही हलकेच हसल्या
बांगड्यांचे पैसे देऊन
दुकानाबाहेर पडल्या....

Contributor





Source link